संतसाहित्यातील स्त्री-स्वर : बहेणाबाई ते अक्कमहादेवी
संतसाहित्यातील स्त्री-स्वर — बहेणाबाईपासून अक्कमहादेवीपर्यंत, दोन कादंबऱ्यांमागील प्रेरणा.
संतपरंपरेत स्त्रियांचा स्वर नेहमीच होता; तो ऐकला मात्र उशिरा गेला. संत बहेणाबाई आणि बाराव्या शतकातील शिवशरणे अक्कमहादेवी — या दोघींच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिताना हा स्वर आजच्या वाचकापर्यंत पोहोचवावा, ही तळमळ होती.
'देवलसी संत बहेणाबाई'ला एका वर्षात सात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, तर 'महायोगिनी अक्कमहादेवी'ला सहा. पण खरा पुरस्कार म्हणजे — या संतस्त्रियांचे जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचले, हा.
श्रुतीश्री वडगबाळकर