स्त्री-आत्मचरित्रांचा शोध : एका संशोधनाची गोष्ट
स्त्री-आत्मचरित्रांचा शोध — १९१० ते १९९५ या कालखंडावरील पीएच.डी. संशोधनाची गोष्ट.
मराठी साहित्यात स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे ही केवळ व्यक्तिगत आठवणी नाहीत — ती त्या-त्या काळातील समाजाची, स्त्री-जीवनाची आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेची साक्षीदार दस्तऐवज आहेत. १९१० ते १९९५ या कालखंडातील स्त्री-आत्मचरित्रांचा सामाजिक अंगाने अभ्यास हा माझ्या पीएच.डी. संशोधनाचा विषय होता.
या संशोधनातूनच पुढे 'सावलीतील बंध-अनुबंध' — मराठीतील लेखक-पत्नींच्या आत्मचरित्रांतील निवडक उताऱ्यांचे संपादन — आणि 'महाराष्ट्रातील स्त्री विचारधारा' ही संपादने आकाराला आली. स्त्रीसाहित्य आणि स्त्रीवाद यांचा अभ्यास हे माझ्या साहित्यसेवेचे एक सूत्र राहिले आहे.